एकदिवसीय क्रमवारीचे अव्वल स्थान हेच साऱ्यांचेच लक्ष्य Print

पी.टी.आय., दुबई
क्रिकेटच्या मोसमाला सुरुवात झाली असून आठही अव्वल संघांचे लक्ष्य एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचेच असेल. गेल्या काही दिवसांपूर्वी तिन्ही क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक पटकावत दक्षिण आफ्रिकेने एक नवा विक्रम केला होता, पण सध्याच्या घडीला मात्र इंग्लंडने त्यांच्याशी बरोबरी केल्याचे दिसते आहे.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोघांचेही प्रत्येकी १२१ गुण आहेत, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला अव्वल स्थान इंग्लंडबरोबर विभागून घ्यावे लागत आहे. भारतीय संघ सध्या ११७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून इंग्लंडला आपल्या मातीत धूळ चारून अव्वल क्रमांकावर जाण्याचे त्यांचे मनसुबे असतील. चार वेळा विश्वचषक पटकावलेला ऑस्ट्रेलियाचा संघ क्रमवारीत ११३ गुणांनिशी चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंकेचा संघ १०८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.