महाराष्ट्राच्या कर्णधारपदी विशांत मोरे Print

सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी, पुणे
ओडिशाविरुद्ध होणाऱ्या सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या २५ वर्षांखालील संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक विशांत मोरे याच्याकडे सोपविण्यात आले आहे. हा सामना मालवण येथे २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी हा संघ जाहीर केला. महाराष्ट्र संघ-विशांत मोरे (कर्णधार व यष्टिरक्षक), अवधूत दांडेकर, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, प्रयाग भाटी, संग्राम अतितकर, गणेश गायकवाड, निकित धुमाळ, सुनील यादव, नासिर मोमीन, सत्यजित बच्छाव, नीतिश सालेकर, अभिजित साळवी, पुष्कराज चव्हाण, गणेश कुकडे.