पुणे वॉरियर्स जेसी रायडरला डच्चू देणार? Print

पी.टी.आय., नवी दिल्ली
न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज जेसी रायडर याला पुणे वॉरियर्स करारमुक्त करणार असून, यंदाच्या आयपीएलकरिता तो नव्याने लिलावासाठी उपलब्ध होणार असल्याचे समजते. दिल्ली डेअरडेव्हिल्सही रॉबिन बिश्त या खेळाडूला करारातून मुक्त करणार असल्याचे समजते.
आयपीएलचे विद्यमान विजेते कोलकाता नाईट रायडर्स संघातील मुख्य खेळाडूंना आपल्याकडेच ठेवणार आहे. डेअरडेव्हिल्स संघही माहेला जयवर्धने, केविन पीटरसन, मोर्न मोर्कल, डेव्हिड वॉर्नर, आंद्रे रसेल व रॉस टेलर यांना सोडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चॅम्पियन्स ट्वेन्टी२० स्पर्धेसाठी त्यांनी योगेश नागर, पुनीत बिश्त, शहबाज नदीम व मनप्रीत जुनेजा या तरुण खेळाडूंना संधी दिली होती.