कसोटी पदार्पणासाठी मेहनत घेतोय -रोहित शर्मा Print

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

कसोटी पदार्पणासाठी मी प्रचंड मेहनत घेत आहे. काही गोष्टी माझ्या हातात नसतात, त्याबाबत मी काही करू शकत नाही. माझ्यापरीने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी घेत आहे. माझे कौशल्य सिद्ध करण्यासाठी रेल्वेविरुद्धचा सामना ही उत्तम संधी आहे.
या सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करत निवड समिती आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. हंगामाची सुरुवात चांगल्या खेळीने करायची आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव महत्त्वाचा असतो. सकारात्मक मनोवृत्तीने मैदानात उतरण्याचा निश्चय केला आहे. सचिन आणि झहीरच्या समावेशामुळे मुंबईचा संघ बळकट झाला आहे.