ट्वेन्टी-२०मधून निवृत्तीचे वृत्त सेहवागने फेटाळले Print

पी.टी.आय., नवी दिल्ली

ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारण्याचा कोणताही विचार नसल्याचे सेहवागने स्पष्ट केले. हे वृत्त चुकीचे आहे, ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारायची आहे असे कोणतेही पत्र मी बोर्डाला सादर केलेले नसल्याचेही त्याने सांगितले.
‘कोणताही ठोस आधार नसलेली बातमी.. कोणत्याही प्रकारच्या सामन्यातून मला निवृत्ती हवी आहे अशी विनंती मी कधीही केलेली नाही.. तयारी झाली आहे आणि मैदानावर उतरण्यासाठी मी आतुर झालो आहे’ असे सेहवागने आपल्या ट्विटर प्रोफाइलवर म्हटले आहे.
एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ट्वेन्टी-२० प्रकारातून सेहवाग निवृत्ती घेणार अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.