मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार- रहाणे Print

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

क्रमवारीत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार असल्याचे मुंबईकर अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले. विशिष्ट क्रमांकावरच फलंदाजी करायची आहे असा माझा हट्ट नाही, त्यामुळे संघाच्या योजनेनुसार फलंदाजी करायला आवडेल असे त्याने सांगितले. धावा करणे हे माझे काम आहे. इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात पहिल्या डावात फारशी चमक न दाखवणाऱ्या रहाणेने दुसऱ्या डावात मात्र अर्धशतक झळकावले होते.