ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा सहारातर्फे सत्कार Print

लखनौ : लंडन ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंचा सहारातर्फे सत्कार करण्यात आला. रौप्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ३ किलोच्या सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. कांस्यपदकप्राप्त खेळाडूंना प्रत्येकी २ किलोच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. रौप्यपदकप्राप्त नेमबाज विजय कुमार आणि कुस्तीपटू सुशील कुमार यांच्यासह कांस्यपदकविजेते गगन नारंग, सायना नेहवाल, मेरी कोम आणि योगेश्वर दत्त हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते.