आँस्ट्रेलियन खेळाडू मायकल क्लार्क आय.पी.एल च्या पुणे संघातून बाहेर Print

alt

आय.पी.एल स्पर्धेतून आत्तापर्यंत १७ आँस्ट्रेलियन खेळाडूंना वगळण्यात आले.
सिडनी, २ नोव्हेंबर २०१२
आँस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार मायकल क्लार्क याला आय.पी.एल स्पर्धेतून पूणे संघामार्फत बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आय.पी.एल मधील संघांमधून वगळण्यात आलेल्या आँस्ट्रेलियन खेळाडूंपैकी मायकल क्लार्क हा १७ खेळाडू ठरला आहे. गेल्या आय.पी.एल च्या मोसमात मायकल पुणे संघातून खेळत होता आँस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर मायकल पुणे संघात सामिल झाला होता पण त्याने खेळलेल्या एकूण सहा सामन्यांमध्ये प्रत्येक चेंडूमागे एक यारीतीने १६.३३ सरासरीने धावा मायकलने केल्या होत्या.
पुणे संघाच्या अहवालानुसार संघात एकूण पाच आँस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश होता त्यातील मीथ मार्श या एका आँस्ट्रेलियन खेळाडूला संघाने आरक्षीत ठेवले असून मायकल क्लार्क समवेत स्टीव्ह स्मिथ, कॅलम फाँर्गुसन आणि जेम्स होप्स यांना संघामार्फत आरक्षीत ठेवलेले नाही.
आय.पी.एल च्या गेल्या पर्वात झालेल्या बदलांत डेक्कन चार्जर्सच्या आर्थिक वादावरून भारतीय क्रिकेट मंडळाने संघाला बाद केले होते. आता हैद्रबादसंघाची मालकी बदलून संघाचे स्पर्धेतील अस्तित्व टीकून राहण्यासाठी नविन परवान्याचा अर्ज भारतीय क्रिकेट नियामकमंडळा(बी.सी.सी.आय)कडे करण्यात आला आहे. याआधीही आय.पी.एल मधील संघांनी आँस्ट्रेलियन खेळाडूंना वगळत इतर खेळाडूंना प्राधान्य दिले आहे.
*आय.पी.एल मधील संघांतर्फे वगळण्यात आलेले आँस्ट्रेलियन खेळाडू-
अँन्ड्रु मँकडोन्ल्ड(राँयल चॅलेंजर्स बंगळुरू), जाँर्ज बेली,डाँल्फ बाँलिंजर(चैन्नई सुपरकिंग्स), ट्राविस बर्ट, एराँन फिच, ग्लेन मॅक्सवेल(दिल्ली डेअरडेव्हिल्स), डॅनियल क्रिस्तर्न, डॅनियल हॅरिस(डेक्कन चार्जर्स), क्लिंट मॅक्ये(मुंबई इंडीयन्स), मायकल क्लार्क, कॅलम फाँर्गुसन, जेम्स होप्स, स्टीव्ह स्मिथ(पुणे वाँरियर्स), बेन कटिंग, जेम्स फाँल्नेर, रँन हँरिस(किंग्स इलेव्हन पंजाब).