राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर Print

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
नंदीनगर (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे पुरुष (फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन) आणि महिला संघ येथे जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा ८ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्राचे संघ- पुरुष (फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन या प्रमाणे)- ५५ किलो- विशाल माने, प्रदीप फरकाटे. ६० किलो-संजय पाटील, वसंत सरवदे. ६६ किलो-रणजित नलावडे, सागर पाटील. ७४ किलो-कौतुक डफळे, अण्णासाहेब जगताप. ८४ किलो-सरदार सावंत, अतुल पाटील, ९६ किलो-महेश वरुटे, संतोष शिंदे. ९६ किलोवरील-विजय चौधरी, योगेश पवार. मार्गदर्शक-दत्ता माने, गोविंद पवार. व्यवस्थापक-सीताराम भोतमांगे, कृष्णांत पाटील. तांत्रिक अधिकारी-दिनेश गुंड, बंकट यादव.