सोमदेव उपांत्यपूर्व फेरीत Print

एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धा
पी.टी.आय.
चालरेट्सव्हिले, अमेरिका
सोमदेव देववर्मनने जपानच्या तारो डॅनियलवर मात करत एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सोमदेवने डॅनियलला ४-६, ७-५, ६-१ असे नमवले. वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या सोमदेवची पुढची लढत अमेरिकेच्या डेनिस कुडलाशी होणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे हंगामाचा पहिला टप्प्याला मुकणाऱ्या सोमदेवने लंडन ऑलिम्पिकद्वारे व्यवसायिक टेनिसमध्ये पुनरागमन केले होते.