गिलख्रिस्ट पुढील वर्षी आयपीएलमध्येही खेळणार Print

पी.टी.आय.
नवी दिल्ली
धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट पुढच्या वर्षीही आयपीएलमध्येही खेळणार आहे. संघात कायम राखलेल्या तसेच डच्चू देण्यात आलेल्या खेळाडूंची यादी आयपीएल संघांनी जाहीर केली. किंग्ज इलेव्हन पंजाबने गिलख्रिस्टला आपल्या ताफ्यात कायम ठेवल्याने पुढच्या वर्षी आयपीएलमध्येही गिलख्रिस्टचा खेळ पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. या वर्षीच्या आयपीएलमध्ये मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे बहुतांशी सामन्यात गिलख्रिस्टला खेळता आले नव्हते.