बिपिन अकादमीचे फुटबॉल शिबीर १० नोव्हेंबरपासून Print

क्रीडा प्रतिनिधी
मुंबई
बिपिन फुटबॉल अकादमीचे मोफत शिबीर १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. १६ वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी हे शिबीर खुले आहे. खालील ठिकाणी हे शिबीर होणार असून प्रवेशासाठी केंद्र संचालकांशी संपर्क करावा.
मीरा रोड : एन एच एज्युकेशन ट्रस्ट, प्रमुख प्रशिक्षक : सलीम डिसुझा, केंद्र संचालक : रुडॉल्फ डिकुन्हा (८३९०८९६८९८). विक्रोळी : रवींद्र म्हात्रे मैदान, विकास हायस्कूलसमोर, प्रमुख प्रशिक्षक :प्रमोद ब्रीद, केंद्र संचालक : सचिन पांचाळ. कल्याण : मॅक्सी मैदान, प्रमुख प्रशिक्षक : अब्दुल सिद्दीकी, केंद्र संचालक : थॉमस कॅस्टेलिनो (९००४७८२९६८). चर्चगेट : मुंबई शालेय क्रीडा संघटना, मेट्रो सिनेमाजवळ, प्रमुख प्रशिक्षक : सुब्रमण्यम पिल्ले, केंद्र संचालक : डायगो डिसुझा (९९८७८०१५४१). ओव्हल (झोपडपट्टीतील मुलांसाठी), प्रमुख प्रशिक्षक : सुरेश रावल्लू, केंद्र संचालक : बॉस्को फर्नाडिझ (९२२०८८९०८१).