वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर Print

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
नंदीनगर (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे पुरुष (फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन) आणि महिला संघ येथे जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा ८ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी ही निवड जाहीर केली. लोणीकंद येथील जाणता राजा प्रशिक्षण केंद्र येथे झालेल्या चाचणी स्पर्धेत १२५ खेळाडूंनी भाग घेतला. महाराष्ट्राचे संघ-पुरुष (फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन या प्रमाणे)-५५ किलो-विशाल माने, प्रदीप फरकाटे. ६० किलो-संजय पाटील, वसंत सरवदे. ६६ किलो-रणजित नलावडे, सागर पाटील. ७४ किलो-कौतुक डफळे, अण्णासाहेब जगताप. ८४ किलो-सरदार सावंत, अतुल पाटील, ९६ किलो-महेश वरुटे, संतोष शिंदे. ९६ किलोवरील-विजय चौधरी, योगेश पवार. मार्गदर्शक-दत्ता माने, गोविंद पवार. व्यवस्थापक-सीताराम भोतमांगे, कृष्णांत पाटील. तांत्रिक अधिकारी-दिनेश गुंड, बंकट यादव.  
महिला-४८ किलो-कौशल्या वाघ. ५१ किलो-माधुरी घराळ. ५५ किलो-समिक्षा कटारे. ५९ किलो-देवकी राजपूत. ६३ किलो-शोभा भोसले. ६७ किलो-राणी माने. ७२ किलो-अश्विनी बोराडे. व्यवस्थापक-रिता ठाकूर, मार्गदर्शक-अजयसिंग. तांत्रिक अधिकारी-मोहन खोपडे.