चर्चिलचा पुण्यावर एक गोलने विजय Print

आय-लीग फुटबॉल
क्रीडा प्रतिनिधी
पुणे
रॉबर्ट सिल्व्हा याने पेनल्टी किकद्वारे केलेल्या एकमेव गोलमुळेच चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत यजमान पुणे  फुटबॉल क्लबला १-० असे पराभूत केले. या लढतीत ९२व्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्सला पेनल्टी किकची संधी मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा घेत चर्चिल ब्रदर्सच्या सिल्वाने अचूक गोल केला.