भूपती-बोपण्णा जोडीला विजेतेपद Print

पी.टी.आय.
पॅरिस
भारताच्या महेश भूपती व रोहन बोपण्णा यांनी पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत येथे विजेतेपद मिळविले. त्यांनी अंतिम फेरीत एहसाम उल हक कुरेशी व जीन ज्युलियन रॉजर यांच्यावर ७-६ (८-६), ६-३ अशी मात केली.
भूपती व बोपण्णा यांचे यंदाच्या मोसमातील दुसरे विजेतेपद आहे. त्यांनी दुबई एटीपी स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. भारतीय जोडीने मास्टर्स स्पर्धाच्या मालिकेतील अंतिम स्पर्धेची पात्रता यापूर्वीच पूर्ण केली आहे.