भारतीय हॉकी संघातून संदीप, शिवेंद्रला डच्चू Print

पी.टी.आय., नवी दिल्ली
ड्रॅगफ्लिकर संदीप सिंग याच्याबरोबरच शिवेंद ्रसिंग, इग्नेस तिर्की, सरवणजीत सिंग, गुरबाज सिंग या अनुभवी ऑलिम्पिकपटूंना भारतीय हॉकी संघातून डच्चू देण्यात आला आहे. चॅम्पियन्स करंडक व लॅन्को आंतरराष्ट्रीय सुपर सीरिज हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची सोमवारी निवड करण्यात आली.
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करणारा भरत छेत्री, तसेच तुषार खंडकर यांना याआधीच संभाव्य ३३ खेळाडूंमधून वगळण्यात आले होते. आगामी तीन वर्षांमधील स्पर्धा लक्षात घेऊनच भारतीय संघ निवड समितीने युवा खेळाडूंना संधी देण्याचे ठरविले होते. दुखापतीमुळे ऑलिम्पिकवारी हुकलेला मुंबईचा युवराज वाल्मिकी याने संघात पुनरागमन केले आहे.
लॅन्को आंतरराष्ट्रीय सुपर सीरिज स्पर्धा २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणार आहे. या स्पर्धेत भारत व ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड संघांचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना २२ नोव्हेंबर रोजी इंग्लंडशी होणार आहे.