माजी क्रिकेटपटू रॉबिन जॅकमन यांना कर्करोग Print

जोहान्सबर्ग :
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रॉबिन जॅकमन यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. कर्करोगावर सात आठवडय़ांची रेडिओथेरपी त्यांच्यावर करण्यात येईल. या शस्त्रक्रियेतून असाध्य वाटणाऱ्या कर्करोगाची गाठ त्यांच्या स्वरयंत्रातून काढण्यात येईल. या शस्त्रक्रियेनंतर जॅकमन यांना चार आठवडय़ांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. जे घडले ते चांगले नक्कीच नाही, पण कर्करोग झाल्याचे मला लवकर समजले आणि यामधून लवकरच मी बाहेर पडेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.