भारत-पाकिस्तान सामन्यांच्या तिकीटांना उदंड प्रतिसाद Print

दुबई :
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या टप्प्याच्या तिकीट विक्रीला प्रारंभ झाल्यापासून फक्त तीन तासांमध्येच एजबस्टनला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट्स संपूर्णपणे विकल्या गेल्या आहेत. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या १५ सामन्यांच्या तिकीट्स पहिल्या टप्प्यात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या सामन्याच्या आणखी तिकीट्स लवकरच उपलब्ध करण्यात येतील, असे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. सोमवारी सकाळपासून तिकीट विक्रीला प्रारंभ झाला. पुढील वर्षी १५ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात एजबस्टनला हा सामना होणार आहे.