बंदीच्या कारवाईविरोधात खेळाडू अपील करणार Print

पी.टी.आय.
नवी दिल्ली
आशियाई कांस्यपदक विजेत्या मौसम खत्री याच्यासह ११ खेळाडू उत्तेजक सेवनप्रकरणी घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीकडे अपील करणार आहेत. या खेळाडूंवर दोन वर्षांपूर्वी उत्तेजकप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.
राजीव तोमर, जोगिंदर सिंग, सुमित सेहरावत, राहुल मान, गुरशरणप्रीत कौर, मौसम खत्री (कुस्ती), सौरभ विज, आकाश अंतील (अ‍ॅथलेटिक्स), अमर मुरलीधरन, जोत्स्ना पानसरे, रिचा मिश्रा (जलतरण) या खेळाडूंची २०१०मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती व त्यामध्ये हे खेळाडू दोषी आढळले होते.
या खेळाडूंवर दोन वर्षांकरिता बंदी घालण्यात आली होती. मात्र काही अटींवर या खेळाडूंना राष्ट्रीय व काही आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेण्यास परवानगी देण्यात आली होती. या खेळाडूंविरुद्धच्या प्रकरणांची अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नाही.