मुंबईच्या कर्णधारपदी रोहित शमा Print

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
अजित आगरकरला दुखापत झाल्याने दुसऱ्या रणजी सामन्यासाठी कर्णधारपदी रोहित शर्माची निवडकरण्यात आली. मुंबईचा दुसरा रणजी सामना गतविजेत्या राजस्थानशी ९ ते १२ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे.
आगरकरकडे पहिल्या चार रणजी सामन्यांसाठी कर्णधारपद देण्यात आले होते. पण पोटऱ्यांच्या दुखापतीमुळे त्याला हा सामना खेळता येणार नाही. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि अजिंक्य रहाणे भारतीय संघाबरोबर असल्यामुळे रोहितच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या क्षेमल वायंगणकर, शार्दुल ठाकूर आणि हिकेन शाह यांना या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
मुंबईचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अखिल हेरवाडकर, रमेश पोवार, हिकेन शाह, आदित्य तरे, इक्बाल अब्दुल्ला, सूर्यकुमार यादव, क्षेमल वायंगणकर, शार्दुल ठाकूर, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, अंकित चव्हाण, अभिषेक नायर आणि शोएब शेख.