कबड्डी : ओएनजीसीची विजयी सलामी Print

मुंबई : बलाढय़ ओएनजीसीने आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. संथ सुरुवातीनंतर ओएनजीसीने युनियन बँक ऑफ इंडियाचे आव्हान २८-१२ असे संपुष्टात आणले. राजेश कुमार विजयाचा शिल्पकार ठरला.
महिलांमध्ये मुंबई पोलिस संघाने छत्तीसगढवर १९-१६ अशी बाजी मारली. आरती नार्वेकर आणि शीतल शिंदे यांच्या आक्रमक आणि बचावात्मक खेळाचा मिलाफ घडवत विजय साकारला. शिवशक्तीने डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी संघाचा सहज धुव्वा उडवला.