हॉकी इंडिया लीगसाठी खेळाडूंचा लिलाव १ डिसेंबरला Print

पी.टी.आय., नवी दिल्ली
हॉकी इंडियाच्या बहुचर्चित हॉकी इंडिया लीगसाठी खेळाडूंचा लिलाव १ डिसेंबरला नवी दिल्लीत होणार आहे. ‘‘आजपर्यंत हॉकीतील कोणत्याही लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आलेला नाही. सर्वोत्तम खेळाडू निवडण्यासाठी सहा फ्रॅन्चायझींना संधी मिळणार आहे,’’ असे हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा यांनी सांगितले. लिलावासाठी ९० परदेशी आणि १५० भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. प्रत्येक संघाला किमान १० परदेशी आणि १४ भारतीय खेळाडू संघात ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.