भारतीय संघाचा सराव ब्रेबॉर्नवर आजपासून Print

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
अहमदाबादला १५ नोव्हेंबरपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे तीन दिवसांचे सराव सत्र शुक्रवारपासून ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय संघ शुक्रवारी दुपारी सराव करणार आहे. त्यानंतर उर्वरित दोन दिवस पूर्ण दिवसांचे सराव सत्र असेल, असे बीसीसीआयकडून समजते.  भारतीय संघ १२ नोव्हेंबरला सकाळी अहमदाबादला प्रयाण करणार आहे.