पेस-स्टेपानेक उपांत्य फेरीत Print

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धा
पी.टी.आय., लंडन

तिसऱ्या मानांकित लिएण्डर पेस आणि रॅडीक स्टेपानेक जोडीने बारक्लेस एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पेस-स्टेपानेक यांनी ‘अ’ गटातील आपला दुसरा सामना जिंकताना मार्सेल ग्रॅनोल्लर्स आणि मार्क लोपेझ या स्पेनच्या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. भारत-चेक प्रजासत्ताक जोडगोळीने फक्त ३२ मिनिटांत ७-५, ६-४ असा सहज पराभव केला.
पेस-स्टेपानेक जोडीने सकाळच्या सत्रात गटातील पहिल्या सामन्यात ऐसाम उल हक कुरेश आणि जीन ज्युलियन रॉजरचा ४६ मिनिटांत पराभव केला. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये पेस-स्टेपानेकने फक्त पाच सव्‍‌र्हिसचे गुण गमावले. पेस-स्टेपानेक जोडीने या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, सोनी ओपन आणि शांघाय रॉलेक्स मास्टर्स स्पर्धा जिंकण्याची किमया साधली आहे.