अध्यक्षपदी मल्होत्रा यांची फेरनिवड Print

भारतीय तिरंदाजी महासंघ निवडणूक
नवी दिल्ली, पी.टी.आय.
भारतीय तिरंदाजी महासंघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांची फेरनिवड झाली. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या मल्होत्रा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बी.व्ही.पी.राव यांचा ७२-२० असा दणदणीत पराभव केला.
मल्होत्रा यांच्या फेरनिवडीमुळे सलग ४० वर्षे ते अध्यक्षपदावर राहण्याचा विक्रम करणार आहेत. यंदा प्रथमच या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यापूर्वी १९७३ पासून ते बिनविरोध निवडून येत होते. महासंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी त्रिलोचनसिंग यांची निवड झाली तर खजिनदारपदी वीरेंद्र सचदेव हे निवडून आले. महासंघाच्या सरचिटणीसपदी अनिल कामिनेनिओ यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी असलेल्या आठ जागांवर कैलाश मुरारका, किरेन रिजिऊ, संजीव पॉल, कुलबीरसिंग कांग, एम.डब्ल्यू नोंगब्री, अजय गुप्ता व एम.एल.जडाम यांची निवड झाली.