थिंकसेंटर एज ७२ झेड Print

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

गेल्या अनेक वर्षांत लिनोवोने भारतीय बाजारपेठेत चांगलीच आघाडी घेतली आहे. आता घराघरांत हा ब्रॅण्ड दिसू लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सामान्य भारतीयांना परवडेल, अशा किमतीत त्यांचे संगणक बाजारात आणले आहेत. सामान्य माणूस संगणक खरेदी करतो त्यावेळेस गरज ही त्याचे प्राधान्य असते. पण मग त्यातही थोडी स्टाइलही मिळाली तर असाही विचार तो करतो. भारतीय घरांमध्ये होणारी संगणक खरेदी ही प्रामुख्याने घरातील तरुण मुलांसाठी असते. या मुलांना स्टाइलिश संगणक अधिक आवडतो आणि त्याचवेळेस तो चांगला कामामध्ये खात्रीशीरही हवा असतो. या सर्व गोष्टी लिनोवोने एकत्र साधल्या आहेत.
आता त्यांनी बाजारात आणलेला थिंकसेंटर एज ७२ झेड हा डेस्कटॉपही याच परंपरेत मोडणारा आहे. आकर्षक असा २० इंची स्लीक मॉनिटर हे त्याचे दर्शनी रूप. याचे एआयओ पटवर मशीन थर्ड जनरेशन इंटेल कोअर प्रोसेसरवर चालते. यात वेगात मशीन बूट करणारा एचडीडी अ‍ॅक्सिलरेटरही आहे. त्याला मागच्या बाजूस रबर हॅण्डल असून त्यामुळे तो  कुठूनही कुठेही नेणे सोपे जाते. ऊर्जा बचत करणारा असा हा संगणक असल्याचा कंपनीचा दावा असून म्हणूनच त्यावर एनर्जी स्टार पाहायला मिळतात. की बोर्डवर काही पडले तर.. खास करून पाणी किंवा इतर कोणताही द्रव पदार्थ तर काय करायचे, ही अनेकांची चिंता असते. ते ओळखून लिनोवोने या डेस्क टॉपसोबत पाणी किंवा इतर कोणताही द्रव पदार्थ पडल्यानंतर कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, असा खास की बोर्ड दिला आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत   रु. २७, ५००/- पासून पुढे