कमी पैशांत, कर्णमधुर! Print

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

कमी पैशांत चांगले स्पीकर्स देणारी कंपनी म्हणून ‘फेंडा’ हे नाव आपल्या सर्वानाच सुपरिचित आहे. याच कंपनीने बाजारात आणलेली नवीन २.१ स्पीकर्स सिस्टीम हीदेखील अनोखी अशीच आहे. खरेतर तिचे वर्णन कमी पैशांत कर्णमधुर असेच करावे लागेल. स्पीकर्सवर पैसे खर्च करायला अनेक जण कचरतात, आणि कमी पैशांत जे स्पीकर्स येतात त्यांचे कर्णमधुरतेशी काही फारसे देणे-घेणे नसते, असा अनुभव आहे. या पाश्र्वभूमीवर या कंपनीने बाजारात आणलेल्या स्पीकर्सचे चांगले स्वागत होते आहे. एफ अ‍ॅण्ड डी ए१११एफ असे या मॉडेलचे नाव आहे. चांगला, मोठा आणि कर्णमधुर आवाज हे त्याचे वैशिष्टय़ आहे. कमी किमतीतही मोठा आवाज असणारे काही स्पीकर्स आज बाजारात आहेत. पण त्यांचा आवाज वाढतो तेव्हा तो फाटतही जातो, असाही अनुभव आहे.
या स्पीकर्सची क्षमता तब्बल ३००० वॅटस्ची आहे. यामध्येच ऑटोमेटिक बिल्ट-इन व्होल्टेज रेग्युलेटरही आहे. १६०-२८० व्ही एसीवर हा काम करतो. याच्या बांधणीसाठी उत्तम लाकडी कॅबिनेटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बास अधिक असताना आवाज फाटत नाही. महत्त्वाचे म्हणजे हे स्पीकर्स संगणक, एमपीथ्री, टीव्ही, डीव्हीडी प्लेअर्स अशा कोणत्याही उपकरणांना जोडता येतात. त्याशिवाय ते एसडी कार्ड रीडर, यूएसबी यालाही सपोर्ट करतात. यावर एमपीथ्री आणि डब्लूएमए हे फॉर्मॅट काम करतात. यामध्येच एफएम रेडिओही अंतर्भूत करण्यात आला आहे. शिवाय याच्या वापरासाठी सोबत फ्लोरोसंट रिमोट कंट्रोलही देण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत - रु. ३,९९० /