सॅमसंग एचटी- इ ६७५० डब्लू Print

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

सध्या सगळीकडे एलसीडी, एलइडी टीव्ही आणि त्याच्यासोबत होम थिएटर स्पीकर्स वापरले जातात. हे होम थिएटर स्पीकर्स सोबत नसतील, तर मग महागातले ते एलसीडी किंवा एलईडी घेण्याला फारसा अर्थ राहात नाही. क्रिकेटची मॅच असो नाही तर मग ब्लॉकबस्टर सिनेमा त्याची मजा या होम थिएटरवरच लुटायला हवी. अलीकडे अनेक कंपन्यांनी असे होम थिएटर स्पीकर्स बाजारात आणले आहेत. त्यासोबत पूर्वी डीव्हीडी असायचा त्याची जागा आता ब्लू रे डिस्कने घेतली आहे. ब्लू रे डिस्क हा यातील अद्ययावत असा प्रकार आहे. सॅमसंग या प्रसिद्ध कंपनीनेदेखील अशाच प्रकारची होम थिएटर मालिका सध्या बाजारात आणली आहे. या मालिकेत त्यांनी ७.१ चॅनलच्या थ्रीडी ब्लू रे डिस्कची भर घातली आहे. सॅमसंग  एचटी- इ ६७५० डब्लू या नावाने बाजारात आणलेल्या या होम थिएटरमध्ये व्हॅक्यूम टय़ूब्जचा वापर कल्पकतेने करण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या अनावश्यक आवाजाला वगळून केवळ सुश्राव्य असाच आवाज आपल्या कानी पडतो. यासाठी प्रीमियम ग्लास फायबर स्पीकर्सचा वापर करण्यात आला असून त्यामुळे त्याला उष्णतारोधकता आणि कंपनरोधकता प्राप्त झाली आहे. त्यामुळे आवाजाची इतर कंपने जाणवत नाहीत. शिवाय यातील थ्रीडीमुळे आवाजाची सुस्पष्टता अधिकच वाढली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत   रु. ५१,९९०/-