बोस व्हीडिओवेव्ह टू Print

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

बोस म्हणजे ध्वनीच्या सुश्राव्यतेच्या बाबतीत अंतिम शब्द असेच जगभरात मानले जाते. ज्यांच्याकडे बोसची साऊंड सिस्टिम आहे, अशी मंडळी इतरत्र फारशी गाणी ऐकण्याच्या फंदात पडत नाहीत, असा अनुभव आहे. बोसच्या सुश्राव्यतेला तोड नाही, असेच त्यांचे म्हणणे असते. आता त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय बोसने उपलब्ध करून दिला आहे तो म्हणजे बोस व्हीडिओवेव्ह एंटरटेन्मेंट सिस्टिमचा. यात हाय डेफिनेशन टीव्ही तोदेखील बोसचाच, होम थिएटर साऊंड सिस्टिम आणि  म्युझिक सिस्टिम यांचे एकत्रीकरण आहे. ११७ सें.मी. आणि १४० सें. मी. अशा दोन आकारांमध्ये हे एचडी टीव्ही उपलब्ध आहेत. १०८० पी एलइडी बॅकलिट डिस्प्लेमुळे अतिशय चांगल्या दर्जाचे चित्रण त्यावर पाहाता येते. साध्या प्रतिमाही उजळलेल्या दिसतात. अद्ययावत अशा आरएफ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला क्लिक् पॅड रिमोट हे या संचाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. टीव्हीचे बाह्य़ावरण अगदी बारिक अ‍ॅल्युमिनिअम बेझेलचे आहे. एकाच वेळेस सहा उपकरणांशी त्याची जोडणी करता येणे शक्य आहे. होम थिएटर असे म्हटले की मोठे स्पीकर बार्स लक्षात येतात. किंवा अनेक स्पीकर्सचा एक संच अशी काहीशी प्रतिमा आपल्या डोक्यात असते. पण या सिस्टिममध्ये या डिस्प्लेच्या मागच्याच बाजूस होम थिएटर सिस्टिम देण्यात आली आहे. त्यामुळे वेगळे स्पीकर्स, त्यांच्या वायर्स असे जंजाळ आपल्या दृष्टीस पडत नाही. नवीन बोस सिस्टिम अ‍ॅडापे आयक्यू तंत्रज्ञानाचा वापर करते, त्यामुळे ती कुठेही ठेऊन तिचा आस्वाद घेतला जाऊ शकतो. याच्यासोबत मिळणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक खास डक जे आपल्याला आयफोन किंवा आयपॅडसाठी वापरता येऊ शकते.
भारतीय बाजारपेठेतील किंमत
रु. ४,१९,५१३/- (११७ सें. मी.साठी)
रु. ४,९९,३८८/-(१४० सें. मी.साठी)