बजाज पुन्हा एकदा स्कूटर निर्मितीकडे Print

प्रतिनिधी, गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२

भारतातील स्कूटर व्यवसायावर एकहाती सत्ता असणाऱ्या बजाज ऑटोची दुचाकीच्या बदलत्या बाजाराशी जुळवून न घेतल्यामुळे गेल्या काही वर्षांत प्रचंड पिछेहाट झाली़  हल्ली बाईकच्या माध्यमातून भारतीय बाजारावर पुन्हा एकदा आपली पकड घट्ट करण्यात यश मिळविणाऱ्या बजाजचा स्कूटरला पर्याय ठरलेल्या गिअरलेस स्कूटीच्या निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न आह़े  लवकरच बजाजकडून ‘बजाज ब्लेड’ ही गिअरलेस स्कूटर बाजारात आणण्यात येणार आह़े.
१२५ सीसीची डीटीएस-आय इंजिन असलेली ही स्कूटर प्रामुख्याने महिला ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी बनविण्यात आली आह़े  याच्या इंजिनाची क्षमता ११.५ अश्वशक्ती इतकी आह़े  भारतीय बाजारपेठेत महिलांसाठी स्कूटर म्हटल्यावर, गिअरलेस, कमी वजनाची आणि सामान ठेवण्यास मुबलक जागा असणाऱ्या स्कुटीची अपेक्षा असते आणि बजाजने या सर्व अपेक्षा ब्लेड पूर्ण करण्याचा चंगच बांधला आह़े.
किक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट अशा दोन्ही पर्यायांमध्ये ही बाइक उपलब्ध होणार आह़े  तसेच पुढे डिस्क आणि मागच्या चाकाला ड्रम ब्रेक अशी ब्रेकची व्ववस्था असणार आह़े  प्रवास अगदी सुखदायक व्हावा यासाठी दर्जेदार हासड्रॉलिक शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स बसविण्यात येणार आहेत़  या स्कूटीची एक्स- शोरूममधील अपेक्षित किंमत ४०  ते ४५ हजारांपर्यंत असणार आह़े  स्कूटीचे अपेक्षित इंधन कार्यक्षमता ४५ किमी प्रतिलिटर इतकी आह़े  तर अधिकतम वेगमर्यादा ८० किमी प्रतितास असणार आह़े होंडा, महिंद्रा, टीव्हीएससारख्या प्रतिस्पध्र्यावर मात करण्यात आता बजाजची नवी ‘ब्लेड’ कितपत यशस्वी होते, ते लवकरच स्पष्ट होणार आह़े.