अल्टो ८०० Print

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

मारूती सुझुकीच्या अल्टो ८०० या मोटारीचे गेल्या आठवडय़ात मंगळवारी भारतीय बाजारपेठेत दिमाखात आगमन झाले. सुमारे २० हजारापेक्षा अधिक अल्टो ८०० साठी आगावू नोंदणी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वीच्या  मारुती ८०० ची तुलना या अल्टो ८०० शी करण्यात येत आहे. त्याच बरोबर सध्या असलेली के. सीरीज इंजिनची अल्टो व ही नवी अल्टो ८०० यांची तुलना करता त्यात बराच फरक असल्याचे दिसते. ए स्टार या मारुतीच्याच एका मोटारीचे व सध्याच्या अल्टोचे आरेखन एकत्रित करून ही अल्टो ८०० तयार करण्यात आली असल्याचे जाणकार सांगतात.  
नवी अल्टो ८०० पेट्रोल व सीएनजी या दोन इंधन प्रकारात उपलब्ध असून पेट्रोलवर ही अल्टो २२.७४ किलोमीटर प्रति लीटर इतकी तर सीएनजीवर ही ३०.४६ किलोमीटर प्रति किलोग्रॅम इतकी मायलेज देणारी आहे.

अल्टो ८०० ची वैशिष्टय़े
* आरेखनानुसार अंतर्गत रचना व बाह्य़रूप यात वेगळेपण, यात दोन रंगांचा प्रथमच वापर,
* पेटन्ट इंटेलिजन्ट गॅस पोर्ट इन्जेक्षन (आय-जीपीआय) हे ग्रीन तंत्र सीएनजीसाठी  
* गीयर वापरात सहजता यावी यासाठी केबल टाईप ट्रान्समीशन, पाच गीयर
* लांबी/रुंदी/उंची/ व्हीलबेस/ग्राऊंड क्लीअरन्स (सर्व एमएम) - ३३९५/१४९०/१४७५/२३६०/१६०
* टर्निग रेडिअस ४.६ मीटर.
* इंजिन - ७९६ सी.सी.  
*  टर्क - ६९ एनएम-३०००आरपीएम,
* ताकद - ४८ पीएस-६०००आरपीएम
* बुट स्पेस १७७ लीटर्स

मुंबईतील एक्स शोरूम किंमत
पेट्रोल - अल्टो ८००
स्टण्डर्ड - २ लाख ६० हजार ५१२ रुपये.
एलएक्स - २ लाख ९४ हजार ६५५ रुपये.
एलएक्सआय - ३ लाख १७ हजार २७९ रुपये
सीएनजी- अल्टो ८००
स्टण्डर्ड - ३ लाख ३९ हजार ३२२ रुपये.
एलएक्स -३ लाख ५८ हजार २२२ रुपये.
एलएक्सआय - ३ लाख ७७ हजार १७४ रुपये