हटके बाइक Print

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

गेल्या आठवडय़ात आपण जगभरातील काही दुर्मिळ आणि हटके बाइक पाहिल्यात.  या आठवडय़ातही अशाच काही बाइकचा आढावा घेणार आहोत़  या बाइक वापरण्याची किंवा बाळगण्याची संधी आपल्याला मिळतेच असं नाही़, परंतु चित्रात या बाइक पाहाणं हाही एक आनंददायी अनुभव असतो़  बहुतेकांनी आपल्या बालपणी अशा बाइक आणि कारची वर्तमानपत्रांतून येणारी चित्रे कात्रणं करून ठेवलेली असतात़.

  रोजच्या वाटेवर आपल्याला सहजासहजी ज्या गोष्टी पाहायला मिळत नाहीत त्यांचं एक स्वाभाविक आकर्षण मनुष्यमात्राला असतं़  तेच आकर्षण अशा जुन्या - दुर्मिळ बाइकना विशेष किंमत प्राप्त करून देत़ं  उपयोगाच्या दृष्टीने या गाडय़ा किती लाभाच्या किंवा तोटय़ाच्या हा मुद्दाच त्यांच्या दुर्मिळतेपुढे गौण ठरतो़  अशा दुर्मिळ गोष्टी बाळगणं हेच मुळी थाटाचं समजलं जातं़  नेहमी पाहण्यात येणाऱ्या बाइकपेक्षा त्यांची वेगळी वैशिष्टय़ं नेहमीच पाहाणाऱ्याचे लक्ष वेधून घेतात़  अशा गाडय़ांवर स्वार झालेल्यालाही मग एक वेगळीच राजेशाही अनुभवता येत़े  एकंदरीतच बाइक काय किंवा कार काय, गरजेच्या गोष्टीवरून चैनीच्या गोष्टी आणि चैनीच्या गोष्टीवरून शोभा गोष्टींमध्येही रूपांतरित झाल्या़  त्यामुळे आता बाजारात गरजेपोटी गाडी घेणाऱ्यांसाठी पर्याय आहेत, चैनीसाठी घेणाऱ्यांसाठी आहेत़  तसेच केवळ शोभेसाठी गाडय़ा घेणाऱ्यांसाठीही अशा दुर्मिळ गाडय़ांचे पर्याय उपलब्ध आहेत आणि या गाडय़ांचे मूल्य कोण किती शौकीन आहे, त्यावरच ठरत असतं  अशाच काही नेहमी पाहाण्यात न येणाऱ्या बाइक..

१९२४ बीएमडब्यू आर-३२
आज आपण बीएमडब्ल्यूच्या गाडय़ांवर जे बोधचिन्ह पाहातो, ते चिन्ह मिरविणारी सर्वात पहिली बाइक असा या ‘१९२४ बीएमडब्ल्यू आर-३२’ चा लौकिक आह़े  त्या काळात या बाइकचे इंजिन फारच उत्कृष्ट मानले गेले होत़े  या बाइकचा अधिकतम ताशी वेग १०० किमी प्रतितास होता़  इंजिनाची क्षमता ८.५ अश्वशक्ती इतकी होती़  या बाइकमध्ये वापरण्यात आलेली क्लोज सर्किट ऑईलिंग सिस्टम हे बीएमडब्ल्यूच्या अभियंत्यांनी केलेले त्या वेळचे सर्वात आधुनिक आणि नवे संशोधन होत़े  आणि इतका दणदणीत लूक असलेल्या बाइकचे वजन केवळ १०६ किलो होत़े  बाइकची एकंदर सर्वच वैशिष्टय़े त्या काळी खूपच नावाजली गेली़  

१९३९ ब्राऊ सुपिरियर एसएस १००
alt

एसएस१०० पहिल्यांदा १९२४ साली बाजारात आणण्यात आली़  या बाइकच्या इंजिनच्या निर्मितीसाठी स्पोर्ट बाइकचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आह़े  या बाइकने सर्वाधिक वेगाचा विश्वविक्रम ५ वेळा केला आह़े  या प्रकारच्या सर्व बाइक १६० च्या कमाल वेगाच्या कंपनीने दिलेल्या खात्रीसह बाजारात यायच्या़, परंतु,वास्तविक त्यांचा कमाल वेग २०० ते २१०  किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकायचा़  इतक्या प्रचंड वेगातही गाडी डळमळू नये म्हणून गाडीची बांधणी, वजन, बनावट या सर्वच गोष्टींचा अभियांत्रिकीदृष्टय़ा र्सवकष विचार केलेला होता़  इंजिनाची क्षमता १००० सीसी होती, तसेच चार गीअरचीही व्यवस्था होती़  जो वेगाचा थरारक अनुभव घेण्याइतका शूर असेल, त्याच्यासाठी तर ही बाइक म्हणजे पर्वणीच ठरावी़

१९४० क्रॉकर (बिग टँक)
alt
ही मोटारसायकल अमेरिकेत सर्वात लोकप्रिय होती़  ही बाइक हातांनी बनविली जाते आणि मागणीनुसारच बनविली जात़े  तसेच सर्वच लोकांसाठी ती बनविण्यात येत असे नाही़  ही एक आलिशान आणि आरामदायक बाइक आह़े  याचे इंजिन १००० ते १५०० सीसींपर्यंत आह़े  या बाइकचा कमाल वेग १९० किमी प्रतितासाहून अधिक आह़े  गाडीचे सर्वच भाग मोठे आणि शक्तिशाली आहेत़  गीअर केवळ तीनच असले तरीही जरासे एक्सुलेटर दिले तरीही गाडी सहज १०० च्या वेगाला जाऊन टेकत़े  लूकसकट सर्वच बाबतीत झक्कास असणाऱ्या या बाइकची सवारी बाइकवेडय़ांचं एक स्वप्न असत़े

१९३९ बीएमडब्ल्यू, २५५ कॉम्प्रेसर
alt
बीएमडब्ल्यूने १९२० च्या शेवटी शेवटी कॉम्प्रेसर तंत्रज्ञान विकसित केलं  त्यांनी नव्या तंत्रज्ञानाच्या शोधाबद्दल जगात बरीच आघाडीही घेतली़  बीएमडब्ल्यूने दुसऱ्या पिढीतील मोटरसायकल साधारणत: १९३५ च्या सुमारास आणण्यास सुरुवात केली़  त्यापैकीच २५५ कॉम्प्रेसर ही एक बाइक़  नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या बाइकच्या इंजिनाची क्षमता प्रचंड वाढली होती़  हे मॉडेल विशेषत्वाने शर्यतीसाठी विकसित केले गेल़े  त्याचा कमाल वेग २३० किमी प्रतितासापेक्षा अधिक होता आणि वजन १३८ ते १४५ किलोपर्यंत होत़े

१९१५ सायक्लोना
alt
या मोटरसायकलला ऐतिहासिक मूल्य आह़े  हिचे वय आजघडीला किमान १०० वष्रे तरी आह़े  या गाडय़ा १९१० साली तयार करण्यात आल्या होत्या़  आता यापैकी केवळ आठच मूळ गाडय़ा शिल्लक असल्याचा अभ्यासकांचा दावा आह़े  ही एक प्रकारे इंजिन बसवलेली सायकलच होती़, परंतु ही अगदी सुरुवातीच्या काळातील असल्यामुळे अत्यंत दुर्मिळ आणि म्हणूनच अमूल्य आह़े.