प्रतिनिधी
कलेच्या क्षेत्रासारखे मोकळे वातावरण कुठेही नाही, म्हणून तर ‘भाषावाद’ ओलांडून कामे स्वीकारली जातात. पंकज विष्णूने तेच केले व ‘हंटरवाली’ या भोजपुरी चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका स्वीकारली. पारवी हेगडे ही भोजपुरीची आघाडीची तारका आपल्याला नायिका म्हणून लाभल्याने पंकज खूश आहे. सध्या पंकज ‘निवांत’ असतो. एका वृत्तपत्रात त्याच नावाचे त्याने लिहिलेले ‘सदर’ पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार ‘निवांत’ क्षणी काय करतात हे त्यांच्या मुलाखतीतून त्याने जाणून घेतले. अभिनेता म्हणून वाटचाल करतानाच आपल्यातील लेखक त्याला सापडला म्हणायचे. |