‘फेरारी की सवारी’ आज स्टार गोल्डवर Print

प्रतिनिधी
alt

‘फेरारी की सवारी’ हा धमाल चित्रपट शनिवार १५ सप्टेंबर रोजी ‘स्टार गोल्ड’ वाहिनीवर रात्री नऊ वाजता दाखविण्यात येणार आहे. वडील आणि मुलामधील प्रेमावर आधारित या चित्रपटामध्ये फेरारी या आलिशान गाडीचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकेकाळी ही गाडी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मालकीची होती. हा चित्रपट म्हणेज मोठय़ांसह बच्चेमंडळींकरिता केवळ धमाल असल्याचे अभिनेता बोमन इराणी तसेच शर्मन जोशी यांनी सांगितले. स्टार गोल्ड वाहिनीच्या माध्यमातून हा चित्रपट पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर सर्वाना पाहावयास मिळणार आहे.