राणीच्या लावणीचा अंदाज Print

प्रतिनिधी

‘अय्या’ या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी ही एका मराठमोळ्या मुलीची भूमिका साकारत असल्याने हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे. ‘अय्या’ चित्रपटामध्ये राणीने खास नऊवारी साडीत एका लावणी नृत्याचा बारही उडवून दिला आहे. नऊवारी साडी खरोखरच व्यक्तिमत्त्वाला साजेसे रूप देणारी असल्याची प्रतिक्रिया राणीने यानिमित्ताने बोलताना व्यक्त केली आहे. या चित्रपटामध्ये राणी ही आपल्या स्वप्नातील राजकुमाराच्या शोधात असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट माझ्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास राणीने व्यक्त केला आहे.