भ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘कर्तबगार’ Print

प्रतिनिधी
alt

भ्रष्टाचारावर थेट भाष्य करणारा ‘कर्तबगार’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून तो लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. भारत अगेन्स्ट करप्शन या संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. समाजात भ्रष्टाचार खूप प्रमाणात वाढलेला असून समाजव्यवस्थेचा तो एक भागच बनला आहे. शासन, प्रशासन व या समाजव्यवस्थेशी एक निर्भीड तरुण दोन हात करून कसा लढतो, या समाजातील समाजकंटकांना व भ्रष्टाचाराला कसा जेरीस नेतो, अशा मोलाच्या व मार्मिक विषयावर चित्रपटनिर्मिती केली गेली आहे. या चित्रपटाची कथा सामाजिक कार्यकर्ते व नेते हेमंत पाटील यांच्या संघर्षमय जीवनावर बेतलेली आहे. या सिनेमातील एका आयटम साँगमध्ये लिस्ट विजय फराटे कंठशहनाई वादक यांनी कंठशहनाईचा वापर केला असून अशा वाद्याचा वापर या गाण्यासाठी सिनेसंगीत क्षेत्रामध्ये प्रथमच केला आहे. हे गीत गायक आनंद शिंदे आणि रेश्मा सोनवणे यांनी गायले असून यावर नृत्य ज्योती जोशी हिने केले. चित्रपटात नागेश भोसले, मधू कांबीकर, मोहन जोशी, मुख्य भूमिकेत संजय मोहिते यांच्या भूमिका आहेत.