डेन्मार्कमध्ये ‘देऊळ’ ची विजयपताका! Print

प्रतिनिधी
alt

मराठी चित्रपटांच्या इतिहासातील आणखी एक सोनेरी पान ‘देऊळ’ या चित्रपटाने लिहिले आहे. डेन्मार्कमधील कोपेनहेगेनयेथे झालेल्या भारतीय चित्रपट महोत्सवात ‘देऊळ’चा खास शो दाखवण्यात आला असून त्या निमित्ताने दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनाही या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन यंदा उमेश कुलकर्णी आणि हिंदीतील संवेदनशील दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात दाखविण्यात आलेल्या निवडक चित्रपटांत ‘देऊळ’चा समावेश होता. ‘देऊळ’चे दोन खेळ दाखवले गेले. भारताप्रमाणेच डेन्मार्कमध्येही या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. उमेश कुलकर्णी यांच्या ‘वळू’ आणि ‘विहीर’ या दोन चित्रपटांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ‘देऊळ’नेही आपल्या संवेदनशील विषयाने आणि हाताळणीने रसिकांना आपलेसे केले होते. या यशामुळे मराठी चित्रपटांनी एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे, अशी प्रतिक्रिया उमेश कुलकर्णी यांनी दिली. सध्या ते ‘पुणे ५२’ या चित्रपटाच्या तयारीत गर्क आहेत.