मराठी चित्रपट माझ्यासाठी जिव्हाळ्याचा Print

प्रतिनिधी
alt

गेली १० वर्षांहून अधिक काळ मी हिंदी चित्रपट सृष्टीत वावरलो असलो तरी  मातृभाषा असलेल्या मराठी चित्रपटाबद्दल माझा ओढा नेहमीच होता. कधी  ना कधी आपण एखादा मराठी चित्रपट तयार करावा असे नेहमी वाटते होते पण त्याला ‘बालक पालक (बीपी) या चित्रपटाच्या निमित्ताने मूर्त स्वरुप आल्याचे अभिनेता रितेश देशमुख याने सांगितले. बालक-पालक या चित्रपटाच्या फर्स्ट लूक निमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना रितेशने आपेल मराठी प्रेम जाहीर करतानाच यापुढेही आपला प्राधान्यक्रम त्यासाठी राहिल असे स्पष्ट केले. नटरंग, बालगंधर्व आशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले रवी जाधवा यांनी बालक-पालक या वेगळ्या विषयावरील चित्रपटाचेही दिग्दर्शन केल आहे. उत्तुंग ठाकूर याच्या निमित्ताने चित्रपट सृष्टीला एका नवीन निर्मात्याची ओळख होणार आहे. या चित्रपटामध्ये बालक आणि पालक यांच्यातील सुसंवाद तसेच लैंगिक विषयावर मनमोकळेपणाने चर्चा होणे किती गरजेचे आहे हे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट समाजातील सर्व पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा असेल असा विश्वास यानिमित्ताने बोलताना रवी जाधव यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे चित्रपटामध्ये असणारे कलावंत हे नवीन असल््याने त्यांच्या कलागुणांनही यामाध्यामातून वाव मिळाला आहे. रितेश देशमुख यानेही या चित्रपटाच्या निर्मितीचा भार उचलला असल्याने मराठीमध्ये त्याचे पहिल्यांदा आगमन झाले आहे.