प्रियांकाच्या अभिनयाची ‘बर्फी’ Print

दिलीप ठाकूर ,शनिवार, १५ सप्टेंबर २०१२
alt

प्रियांका चोप्रात करिश्माचे अस्सल ग्लॅमर व तब्बूची उत्तम अभिनय समज यांचे छानच मिश्रण आहे. आशुतोष गोवारीकरच्या ‘व्हॉटस युवर राशी’तील तिच्या बारा राशींच्या भूमिका, विशाल भारद्वाजच्या ‘सात खून माफ’मधील सात, तर मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ची एक अशा २० भूमिकांतून तिने जेवढी विविधता, अष्टपैलुत्व दाखवले तेवढे या दशकात एकाही अभिनेत्रीने धाडस केले नाही..
‘फॅशन’वगळता उर्वरित दोन्ही चित्रपट ‘गल्ला पेटी’वर ‘धूम’ मचावू न शकल्याने प्रियांकाची तारीफ झाली नाही.  सिनेमाच्या जगात यशाभोवती सगळे काही असते. प्रियांकाची हीच विविधता अनुराग बसूच्या ‘बर्फी’द्वारे पुढे सुरूच आहे.. माझ्यातील अभिनय क्षमतेवर दिग्दर्शक विश्वास दाखवतात हे मला जास्त महत्त्वाचे वाटते, प्रियांका ‘बर्फी’च्या पूर्वप्रसिद्धीनिमित्ताने ‘थेट’पणे सांगत असते. ती पुढे सांगते, आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देणे मला गरजेचे वाटते. चित्रपट व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी होणे अथवा न होणे माझ्या हाती नसते, पण तो काही कारणास्तव नाकारला गेल्याने माझ्या एकटीचे नुकसान नसते, तर त्या चित्रपटामागील दोनशे-अडीचशे जणांच्या युनिटच्या मेहनतीचे नुकसान असते.
मी ‘काही तरी वेगळे करायचेच’ या हेतूने या भूमिकांकडे पाहत नाही.
अनेक प्रकारच्या चित्रपटांच्या ‘ऑफर’ सतत येत असतात, त्यात आपल्याला
ज्या योग्य वाटतील त्या स्वीकाराव्या,
त्या कामाचा
आनंदही घ्यावा असे मला वाटते. घरून निघताना,
‘अरे बापरे, आज या चित्रपटाच्या सेटवर जायचेय’ असे वाटता कामा नये,
अशी काळजी
घेऊन चित्रपट स्वीकारते.
‘बर्फी’बद्दल मी
काही बोलण्यापेक्षा तो चित्रपटच बरेच काही बोलेल, असेही प्रियांकाने सांगितले.