लावणीचा तडका नि.. Print

प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

सिनेमाच्या जगात फिरताना काही काही प्रश्न करायचे नसतात.. ‘दलम’ (म्हणजे दल) या नक्षलवाद्यांवरील चित्रपटात ‘भलतीच त्याची नजर शिकारी’ या लावणी नृत्याला जागा असेलच कशी? बरं ही लावणी नाही,  त्यात आयटेम डान्सचा तडकाही लावलाय असे कसे? सारा श्रवण हिने या एकाच लावणीपुरती ही भूमिका का बरे स्वीकारली? मुळात धाडसी असणारी सारा (पाटील आडनाव) लालबागवरून विक्रोळीला चित्रीकरणाला जाऊनही ‘दम’ली नाही व दोन दिवसाच्या चित्रीकरणानंतरही  तजेलदार राहिली हे महत्त्वाची.