‘अजिंक्य’ प्रदर्शनाच्या मार्गावर Print

प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

खेळामधील नातं आणि नात्यांमधील खेळ या विषयावर भाष्य करणारा ’अिजक्य’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मराठी चित्रपटांमध्ये प्रथमच बास्केटबॉल खेळातील प्रशिक्षकाच्या आयुष्यातील संघर्षांची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकर प्रथमच या चित्रपटांमध्ये एकत्र दिसणार आहेत.

अभिजित अब्दे यांनी चित्रपटासाठी छायाचित्रण केलं असून अभिजित देशपांडे यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. कथा तेजस देऊस्कर यांची असून पटकथा लेखन व संवाद लेखनात त्यांच्याबरोबर गौतम पोतदार आणि प्रवीण तरडे यांची साथ त्यांना लाभली आहे.
लंडन फिल्म अ‍ॅकॅ डमी येथून फिल्म मेकिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेजस देऊस्कर यांचा हा पहिला व्यावसायिक मराठी चित्रपट आहे.  संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकर, राजन भिसे, प्रवीण तरडे हे मान्यवर कलाकार या चित्रपटामध्ये असून वैभव जोशी यांच्या गीतांना संगीतकार सुस्मीत लिमये यांनी संगीतबद्ध केलं आहे. नवलाखा आर्ट्स मीडिया अ‍ॅन्ड एन्टरटेनमेंट व एस.के.प्रॉडक्शन अ‍ॅन्ड फिल्म निर्मित के.के.ग्रुपची ही प्रस्तुती आहे. या चित्रपटाच्या फस्र्ट लूकचं अनावरण पुण्यात नुकतेच झाले.