विवेकचा ‘केएलपीडी’ Print

प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
गेले अनेक वर्षे पडद्यावरुन गायब झालेला विवेक ओबेरॉय हा आता चक्क मलिका-ए-इश्क मल्लिका शेरावत हिच्या जोडीने ‘केएलपीडी’ (किस्मत लव्ह पैसा दिल्ली) या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. खरे तर किस्मत लव्ह पैसा दिल्ली या नावात तसा काहीच दम नाही. हे नाव जसे विचित्र तसेच विवेक ओबेरॉय व मल्लिका शेरावत ही जोडीही अशीच विचित्र. अशा ‘अडनिडय़ा’ नावाची सुरुवात नेमकी कधी झाली? ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ हे नावही सत्तरच्या दशकात सुरुवातीला विचित्र वाटले. ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘मोहन जोशी हाजीर हो’ अशा नावाची मग सवयही झाली. खूप अलीकडे ‘अक्कड बक्कड बम बोले’, ‘जीना है तो ठोक डाल’, ‘सही धंदे गलत बंदे’, ‘मान गये मुगल-ए-आझम’, ‘बारह आना’ अशा नावाचे चित्रपट वाढले. विवेक ओबेरॉयला हल्ली मोठय़ा बॅनरचे चित्रपट मिळत नसल्याने त्याने हा चित्रपट केला असावा असा पांडित्यांचा अंदाज आहे. खरे खोटे विवेकच जाणे. पण जोडी ती सुध्दा हॉट मल्लिका शेरावत हिच्याबरोबर म्हंटल्यावर अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. आता या चित्रपटामध्ये नेमके काय आहे. मल्लिाकाची हॉट दृश्ये की विवेकचा सुमार अभिनय हे प्रेक्षकांना  पाहावयास मिळणार आहे.