रात्रशाळेचा दर्जा Print

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

काही कलाकारांनी आपल्या कामातून निर्माण केलेली विश्वसनीयता त्यांच्या पुढील चित्रपटाला उपयोगी पडते.. संदीप कुलकर्णी अगदी तसा आहे. ‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘साने गुरुजी’ अशा काही चित्रपटांमुळे संदीप कुलकर्णीबद्दल विश्वास निर्माण झाला. निवडक चित्रपट स्वीकारत त्याने आपले ‘मूल्य’ टिकवले.
नितीन मावानी याचा ‘नाइट स्कूल’ हा त्याचा नवा चित्रपट म्हणूनच चर्चेत आहे. रात्रशाळा व त्याच्या समस्या यावर आधारित कोणत्याही भाषेतला हा पहिला चित्रपट आहे आणि त्याला वास्तवतेचा स्पर्श व्हावा म्हणून त्याचे ओशिवरा येथील खऱ्याखुऱ्या रात्रशाळेत चित्रीकरण करण्यात आले. त्यानिमित्ताने संदीप कुलकर्णीला ‘नाइट स्कूल’चा ‘क्लास’ (अर्थात दर्जा) समजला.