‘आभरान’ मध्ये रिनाची वेगळी भूमिका Print

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

‘आभरान’ या पोतराजावर आधारित चित्रपटामध्ये नवोदीत अभिनेत्री रिना जाधव ही वैविध्यपूर्ण भूमिकेत येत असून हा चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. रिना हिचा अभिनयच्या क्षेत्रामध्ये झालेला प्रवेशही तेवढाच रंजक आहे. सह्य़ाद्री वाहिनीवरील ‘फ्रमिली डॉट कॉम’ या मालिकेमध्ये तिने केलेला अभिनय हा तिच्यासाठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेशाची नांदी देणारा ठरला. यानंतर तिला ‘गंमत एका रात्रीची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका मिळाली. तसेच बॅलन्स टु अवर’ आणि काही बंगाली चित्रपटामध्येही तिने काम केले. हे मिलन सौभाग्याचे या चित्रपटातील तिची भूमिकाही वैशिष्टय़पूर्णच ठरली. मनला काही वेगळ्या व आव्हानात्मक भूमिका करायच्या आहेत असे नेहमी म्हणणाऱ्या रिनाला  ही संधी मिळाली आहे ती आभरान च्या निमीत्ताने. या चित्रपटामध्ये तिने जाई या तरुणीची भूमिका साकारली आहे. आतापर्यंत केलेल्या भूमिकांमध्ये ही वेगळी व आव्हानात्म भूमिका असल्याचे रिनाचे म्हणणे आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर किशोर कदम, शशांक शेंडे, उमेश जगताप, मधु कांबीकर आदींच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील व्य्क्तीरेखेसाशी रिनाने खास अभ्यासही केला असून त्याचा उपयोग झाल्याचे तिचे म्हणणे आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये रिनाच्या माध्यमातून आणखी एका सशक्त अभिनेत्रीची भर पडली आहे.