साराचा आयटम डान्स Print

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

कोणी म्हणतात, सिनेमाच्या छोटय़ा-छोटय़ा बातम्यांना इतके काय गंभीरपणे घ्यायचे. जेवणाच्या ताटातील चटणी, कोथिंबीर इतके त्यांना वृत्तपत्रात स्थान असते वगैरे वगैरे. पण काही काही बातम्यांचा बरा-वाईट परिणाम होतो. त्याची विशेष दखल घेतली जाते. आता हेच बघा ना, ‘दलम’ (म्हणजे दल) या चित्रपटासाठी ‘भलतीच त्याची नजर शिकारी’ या लावणी व आयटेम डान्स यांच्या मिक्स मसाला गाण्यावर ‘सारा श्रवण’ बेभान नाचली, पण अख्ख्या चित्रपटात तिने फक्त एवढय़ाशा नृत्यापुरती भूमिका ती का साकारावी, असा प्रश्न येतो. त्याचीच तर बातमी झाली. (‘तिरक्या चालीच्या गोष्टी’च्याच बातम्या होतात त्या या अशा) निर्माता- दिग्दर्शकाना बातमी पटली व सारा श्रवणचे महत्त्वही पटले. लगोलग त्यांनी तिच्यासाठी एका आदिवासी स्त्रीची भूमिका निर्माण केली. ती भूमिका साकारण्यासाठी ‘लालबागची ही पोर’ आता भंडारदरा येथे जाणार आहे. नक्षलवादी विषयावरचा हा चित्रपट असून, तो वास्तवाच्या जवळ जाणारा आहे, असा ‘सारा’ प्रकार आहे.