शुद्र द रायझिंग Print

शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

हिंदू धर्मात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या (तसे मानणाऱ्या) शूद्र या जमातीवर एखादा निर्माता-दिग्दर्शक चित्रपटनिर्मितीचे आव्हान उचलतो तेव्हा भुवया आपोआप उंचावतात, कारण एका विशिष्ट जातीवर कथानक रचायचे तर एखादा छोटासा तपशील चुकला तरी समाजमन बिथरते, काही गोष्टी स्पष्टपणे मांडण्यात तर सेन्सॉर बोर्ड आक्षेप घेते व इतर समाजावर त्यातून दोष द्यावा तरी नवीन अडचणी येतात. या साऱ्याचा योग्य समतोल साधत आपण ‘शूद्र द रायझिंग’ साकारला आहे, असा दिग्दर्शक संजीव जयस्वाल याचा दावा आहे. दलितांना वर्षांनुवर्षे तोंड द्याव्या लागणाऱ्या भीषण सामाजिक वास्तवाचे या चित्रपटात त्यांनी दर्शन घडवले आहे. पारंपरिक लोकप्रिय चित्रपटाची चौकट बाजूला सारून काही तरी वेगळं करू इच्छिणाऱ्यांच्या अशा प्रयत्नांना यशासाठी काही वेळा झगडावे लागते. ‘शूद्र’चे कसे स्वागत होते ते आता पाहायचे.