इच्छा असेल तर 'रश' Print

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

पत्रकारितेवरचा सिनेमा व सिनेमातले पत्रकाराचे पात्र हे दोन स्वतंत्र विषय आहेत, त्याच्या जेवढे खोलात जावे तेवढी निराशाच पदरात पडते..  ‘रश’चे नेमके काय होईल? त्यात गुन्हेगारीविषयक शोधपत्रकारिता करणारा नायक (तोदेखील इमरान हाश्मी, स्वत:च गुन्हेगार होतो अशी कथा (?) आहे. असे चित्रपटाच्या ‘फर्स्ट लूक’ सादरीकरणाच्या वेळी स्वत: हीरोच सांगत होता. पारंपरिक लोकप्रिय चित्रपटात वास्तवतेवर अतिरंजित कल्पनाशक्तीचा फार भार असतो नि तोच प्रेक्षकांनी पाहावा अशीच निर्माता- दिग्दर्शकांची अपेक्षा असते.
तरी बरं, ‘रश’च्या निमित्ताने इमरान हाश्मीचा प्रसारमाध्यमातील सहा हिकमती गुन्हेगारविषयक पत्रकारांशी संवाद घडवून आणला. चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी हा प्रकार खूप चांगला, पण ‘रश-टू’ अर्थात पुढील भागाच्या निर्मितीसाठी त्यातील बऱ्याच गोष्टी उपयोगी पडतील. अर्थात तशी इच्छा असेल तर..