करणचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ प्रेक्षकांच्या भोटीला Print

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

करण जोहरची दिग्दर्शनिक नजर, फेटा, चेहरे, नवीन लूक तसेच एव्हरग्रीन्स लोकेशन्स यावर चित्रित झालेला व तरुणाईला वश करण्याची खुबी असलेला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट प्रदर्शित होत असून तो यंदाचा सर्वात हिट चित्रपट ठरण्याची चिन्हे आहेत. तरुणाईला सर्व हवे ते देणारा व त्यांची आवड लक्षात ठेवूनच करण जोहरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी रसिकाना ‘अधूनमधून’ नव्या-ताज्या चेहऱ्यांचे चित्रपट पाहायचे असतात. पण ते चित्रपटही कथा-आशय, सादरीकरण यात सरस व सकस हवेत. नुसते ‘नवे मुखडे’ पाहण्यात रसिकांना रस असता तर ‘प्यार में कभी कभी’, ‘रिफ्यूजी’, ‘सावरियाँ’ अशा किती तरी चित्रपटांना स्वीकारले गेले असते. रसिकांचीही पिढी बदलत असते, नवीन पिढीचा जिने का नया फंडा असतो. ‘बॉबी’च्या वेळी ‘हम तुम एक कमरे मे बंद हो’ अशी प्रणय संस्कृती तात्कालिक समाजमनाला ‘फिट’ बसली.. करण जोहरही ‘कुल कुल कुल होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ अशा ‘शाहरुख खान’वाल्या चित्रपटांपासून ‘मुक्त’ होत पुढे आला आहे. त्यामुळे त्याचे दिग्दर्शन व त्यातील कल्पना नवीन राहतील.  या तीन नवीन चेहऱ्यातील वरुण धवल व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यापेक्षा आलिया भट्ट जास्तच लक्ष वेधतेय. तिचा कॅमेऱ्यासमोरचा वावर खूप सहज आहे. तिच्या रूपाने केतरिना-दीपिका-सोनाक्षी यांच्यासमोर ‘एक सुंदर आव्हान’ निर्माण झाले आहे.