श्री पार्टनर:पुन्हा पडद्यावर कादंबरी Print

प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

कादंबरीवरून चित्रपट हे माध्यमांतर कधी काही तडजोडीवरून जमते (उदा. नटरंग) तर काही वेळा खूप पसरटही होते (उदा. निशाणी डावा अंगठा). प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ‘खेळ’ मांडतो.  व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीवरील दिग्दर्शक समीर रमेश सुर्वेचा ‘श्री पार्टनर’ कसा बरे जमला असेल? श्री आणि किरण या दोन प्रेमीजीवांच्या प्रेम ते संसार अशा प्रवासात स्वत:सोबतचे व आपल्या कुटुंबाबरोबरचे बदलत जाणारे नाते व त्यातून बदलत गेलेले प्रश्न याभोवती हा चित्रपट आहे. ‘पार्टनर’च्या भूमिकेत सतिश पुळेकर आहे, (पण त्याला बदला हो, असा काहींनी प्रयत्न करूनही दिग्दर्शकाने त्याच्यावरच विश्वास ठेवला हे महत्त्वाचे.) जोडीला लालन सारंग, पद्नाथ बिंड, श्वेता पगार, दीपक कदम, आकांशा मेहंदळे इत्यादी आहेत. समृद्धी फिल्म व पर्व क्रियेशन्स यांनी ‘पार्टनर’शीपमध्ये हा चित्रपट बनवला आहे. मराठीत सध्या एकाच वेळी अनेक प्रकारचे चित्रपट निर्माण होतात. त्यात प्रेक्षकांची ‘पार्टनरशीप’ कोणाशी होईल हे काही सांगता येत नाही हो.