प्रश्नांची "रश" Print

प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

सिनेमावाल्यांना सुचते काही वेगळं, पण त्यांचे चित्रपट मात्र वेगळा मार्ग पत्करत नाहीत. तेव्हा त्यांना ‘गल्ला पेटी’वरची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. ‘रश’देखील तसाच.
‘क्या न्यूज बन गये है एण्टरटेन्मेंट’.
‘सबसे जादा लोग क्राइम की न्यूज देखते है’.
अशा आकर्षक कॅच लाइन घेत तो आला. पण वास्तवतेला सामोरे जाण्यापेक्षा इमरान हाश्मीच्या ‘हिरो’गिरीला भरपूर वाव-भाव देत रंगला.
सागरिका घाटगे व नेहा धुपिया अशा दोन तारकांच्या सहवासाने तो पसरला..वृत्तपत्रांतून गाजणाऱ्या एखाद्या बातमीवरून सिनेमा काढण्याची प्रेरणा वाईट नाही.
अनेकजण तसा प्रयत्न करतात, पण ती बातमीच विसरायला लावेल असा चित्रपट काय कामाचा? उगच नको नको त्या प्रश्नांची ‘रश’..